Ad will apear here
Next
कर्जमाफीबाबतच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समिती

पुणे : राज्यशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतीतल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी या समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन सहकार आयुक्तालयाने केले आहे. 

तालुक्यातील उप किंवा सहाय्यक निबंधक हे समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका प्रतिनिधी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी आणि लेखापरिक्षक समितीचे सदस्य, तर सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी सचिव म्हणून काम पाहतील. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सहकारी संस्था कार्यालयात समितीची सभा होईल.

राज्यशासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार कृषी कर्जास कर्जमाफी, परतफेड मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान, तसेच एकवेळ परतफेड योजना  राबविण्यात येत आहे. बऱ्याच कर्जखात्यांवर अपुरी माहिती, चुकीची माहिती, चुकीचे लाॅगिंग इत्यादी कारणांमुळे प्रक्रिया करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शासनाकडे, तसेच सहकार विभागाच्या विविध कार्यालयांकडे प्राप्त होत आहेत. या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँका नव्याने कर्जपुरवठा करत नाहीत, अशाही तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शासनाने तालुकास्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZNLCC
Similar Posts
सोने तारण पीक कर्ज बहुतांश शेतकरी आपल्याकडील जमेल तशी शिल्लक रक्कम सोन्यात गुंतवत असल्याचे दिसून येते. अशा गुंतवणुकीतून व्याज अथवा लाभांश स्वरूपात परतावा मिळत नसला, तरी आजही ग्रामीण भागात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. काही अंशी ते खरेही आहे. असे थोडे थोडे करून जमविलेले सोने शेतकऱ्याला प्रसंगी कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडू शकते
‘किसान’ कृषी प्रदर्शन १२ डिसेंबरपासून मोशीमध्ये पुणे : ‘देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ येत्या १२ ते १६ डिसेंबर दरम्यान मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील’,अशी माहिती आयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली
मुलांनी घेतला भात लावणीचा अनुभव पुणे : वारजे येथील ‘श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशन’च्या मातोश्री नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मुळशी येथे भात लावणीचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांनी नुकतीच कातवडी गावाला भेट दिली आणि तेथील भातशेतीत स्वतः भात लावणी केली
राजगडाच्या पायथ्याशी मिळणार शेतकऱ्याच्या घरात राहण्याचा आनंद पुणे : खेडेगाव, शेती, शेतकरी याविषयी शहरी भागातील लोकांना कुतूहल असते. शहरी वातावरणापासून दूर, अस्सल गावरान आणि मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी शहरातील मंडळी आसुसलेली असतात. आता राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात हा आनंद अनुभवता येणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language